अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 11 ऑगस्टला होणार प्रदर्शित

या सिनेमात भरपूर कौटुंबिक नाट्य दाखवण्यात आले आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    पृथ्विराज चित्रपटानंतर आता अभिनेता अक्षय कुमार लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) चित्रपटातून तो लवकर पुन्हा एकदा मोठ पडदा गाजवण्यास सज्ज झालाय.  नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे.

    ‘रक्षा बंधन’ हा सिनेमा बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या सिनेमात भरपूर कौटुंबिक नाट्य दाखवण्यात आले आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.