‘रील ते रिअल… जादू कायम..’- अक्षया देवधरची लग्नानंतरची पहिली पोस्ट, चाहते झाले फिदा

हार्दिक (Hrdik Joshi) आणि अक्षयाने (Akshaya Deodhar) पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास राजेशाही लूक केला होता.

    ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) मालिकेतील राणादा आणि पाठकबाईच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले हार्दिक जोशी (Hardik Joshi) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक आणि अक्षयाच्या विवाहसोहळ्याची खूप चर्चा सुरु आहे. आज पुण्यात पारंपरिक पद्धतीने हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर विवाहबंधनात अडकले. या दोघांचे लग्नाच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच नवविवाहीत अक्षयाने स्वत: लग्नाविषयीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

    View this post on Instagram

     

    A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

    ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून समोर आलेली राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. आता ही रिल जोडी रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकली आहे. त्यानंतर आता अक्षया देवधरने एक खास पोस्ट केली आहे. अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत अक्षया आणि हार्दिक एकमेकांकडे गोड पाहताना दिसत आहे. हा फोटो मंगळसूत्र घातल्यानंतरचा आहे. दुसऱ्या फोटोत ते दोघेही नवविवाहित दाम्पत्याप्रमाणे दिसत आहे. यात अक्षया लाजल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोत हार्दिक हा अक्षयाला भर मांडवात किस करताना दिसत आहे.

    या फोटोला अक्षयाने कॅप्शन दिलं आहे की, “रील ते रिअल… जादू कायम” असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबर तिने #अहा असा हॅशटॅग शेअर करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.

    हार्दिक आणि अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास राजेशाही लूक केला होता. अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे. यांचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.