या व्यक्तीमुळे अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूरचं लग्न होऊ शकलं नाही, त्यामुळे वयाच्या ४६ व्या वर्षीही राहिला अविवाहित!

अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अक्षयचं नाव अद्याप कुठल्याही अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं नाही. या मागे काही खास कारण आहे का? असा प्रश्न वारंवार त्याला विचारलं जातो. अक्षयनं एका मुलाखतीत लग्न न करण्यामागचं खरं कारण सांगितलं.

    अक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर ‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ९० च्या दशकात आपल्या रोमँटिक अंदाजानं तरुणींना वेड लावणारा अक्षय अद्याप अविवाहित आहे. अक्षयचा ४६ वा वाढदिवस आहे.

    अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अक्षयचं नाव अद्याप कुठल्याही अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं नाही. या मागे काही खास कारण आहे का? असा प्रश्न वारंवार त्याला विचारलं जातो. अक्षयनं एका मुलाखतीत लग्न न करण्यामागचं खरं कारण सांगितलं.

    अक्षय म्हणतो, लग्न, “कुठल्याही तरुणीसोबत लग्न करण्यासाठी अद्याप मी मानसिकदृष्ट्या तयार झालेलो नाही. लग्न केल्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. स्वत:सोबतच आपल्या बायकोचा देखील विचार करावा लागतो. तुमच्या एखाद्या निर्णयाचा परिणाम तिच्या आयुष्यावर होणार तर नाही ना? याचा सखोल विचार करावा लागतो. लग्नानंतर मुलं झाली की पुन्हा आणखी एक जवाबदारी वाढते. त्यांचं शिक्षण, पालनपोषण यामध्ये तुमचा वेळ मिळतो. अन् एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पुर्ण करण्यासाठी अद्याप मी तयार झालेलो नाही. त्यामुळं अद्याप मी अविवाहित आहे.”

    म्हणून करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही

    करिश्मा कपूर आणि अक्षय खन्ना लग्नबंधनात अडकणार होते. पण करिश्माची आई बबिताने त्यांच्या लग्नाल विरोध केला. कारण लग्न झाल्यावर करिश्माच्या करियरवर परिणाम होईल असा आईचा समज होता. त्यामुळे अक्षय आणि करिश्माचं लग्न होऊ शकलं नाही.