पैसे दिले आणि फिल्मफेअर घेतला? पुरस्कार घेतल्यानंतर अलाया ट्रोल!

नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. अनेक युजर्सनी अलाया प्रश्न विचारला आहे. “किती पैसे दिले अवॉर्डसाठई”, ” किती रुपयांमध्ये अवॉर्ड खरेदी केलं.” अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

  नुकताच ६६ वा फिल्म फेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिला बेस्ट फिमेल डेब्यूचा अवॉर्ड देण्यात आला आहे. ‘जवानी जानेमन’ या सिनेमासाठी तिला हा अवॉर्ड देण्यात आला. मात्र या अवॉर्डनंतर अलाया ट्रोल झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ALAYA F (@alayaf)

   

  अवॉर्ड मिळाल्यानंतर अलायाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. यानंतर मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अलायाने शेअर केलेल्या फोटोत तिने ट्रॉफी हातात पकडल्याचं दिसतंय.” ही माझी आहे. बेस्ट डेब्यू फिमेल. मी एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत हसतेय. मी खूप आभारी आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी तुमची आभारी आहे.” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांते आभार मानले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ALAYA F (@alayaf)

  नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. अनेक युजर्सनी अलाया प्रश्न विचारला आहे. “किती पैसे दिले अवॉर्डसाठई”, ” किती रुपयांमध्ये अवॉर्ड खरेदी केलं.” अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ALAYA F (@alayaf)

  तर अनेकांनीनी नेपोटिझमवरून तिला ट्रोल केलं आहे. एका युजरने “नेपोटिझम रॉक्स अशी कमेंट तिला दिली आहे.अनेक युजर्सनी अलायाची तुलना अनन्या पांडेसोबत केली आहे. मागच्या वर्षी अनन्या पांडेला पदार्पणासाठी हा अवॉर्ड मिळाला होता.