ॲनिमल थीम पार्टीत आलियाच्या क्यूट लेकीनं वेधलं लक्ष, अनंत अंबानींनं राहावर केला प्रेमाचा वर्षाव!

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रणबीर आणि आलियाची लेक राहाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनंत राहासोबत बोलताना दिसत आहे.

  बी-टाऊन मधली सर्वात क्युट स्टारकीड म्हणजे, रणबीर आणि आलियाची लेक राहा. राहाची एक झलक पाहण्यास चाहते कायम उत्सुक असतात. राहाचं तिच्या आईवडिलांसोबत छान बॅान्डिग आहे. सध्या अंबानी कुटुंबात अनंत आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग फंक्शन जोरात सुरू आहे. या प्री-वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फंक्शनमधीस बेबी राहाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो सर्वांचं मनं जिंकत आहे.

  ॲनिमल थीम पार्टीमध्ये आई आलियासोबत दिसली राहा

  रणबीर कपूर आणि आलियाची मुलगी राहाला पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. दीड वर्षांची राहा अल्पावधीतच बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्सच्या यादीत सामील झाली आहे. राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही वाट पाहत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ती सुद्धा तिच्या आईबाबसोंबत जामनगरला आली आहे.

  राहा तिच्या आई आणि वडिलांसोबत राधिका आणि अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनलाही गेली होती, नुकताच या सोहळ्यातील राहाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट राहाला घेऊन आली होती, तिला पाहताच अनंत अंबानीलाही राहासोबत बोलण्याचा मोह आवरला नाही. अनंत बेबी राहासोबत बोलताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

  यादरम्यान अनंत राहाचा हात पकडून तिला मिठी मारताना दिसत आहे. अनंत आणि राहा यांच्यातील हे बाँडिंग पाहून प्रत्येकजण या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगच्या दुसऱ्या दिवशी ॲनिमल थीम पार्टी होती.

  ॲनिमल थीम पार्टीत दिसली राहाची क्यूट स्टाइल

  या पार्टीत सर्व सेलिब्रिटींनी ॲनिमल थीमचे ड्रेस परिधान केला होता. आईसोबत राहाही प्राण्यांच्या थीमच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती. राहा दोन वेण्यांमध्ये खूप गोंडस दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते अनंत आणि राहा यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.