alia-bhatt

आलिया भट्ट प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. आता आलियाने राहाच्या जन्मानंतरचा तिचा अनुभव शेअर केला आहे आणि सांगितले की तिने तिच्या मानसिक आरोग्यासाठी थेरपी देखील घेतली होती.

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता अलीकडेच आलियाने खुलासा केला आहे की मुलगी राहाच्या जन्मानंतर तिला तिच्या मानसिक आरोग्याची (Mental Health) विशेष काळजी घ्यायची असल्याने तिला थेरपी घ्यावी लागली. जाणून घेऊया काय म्हणाली आलिया.

    आलिया भट्ट तिच्या व्यवसायिक आयुष्य तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेच चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. मग ते तिचे पती रणबीर कपूरसोबतचे नाते असो किंवा मुलगी राहा कपूरसोबतचे तिचे संस्मरणीय क्षण असो. आलिया प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. आता आलियाने राहाच्या जन्मानंतरचा तिचा अनुभव शेअर केला आहे आणि सांगितले की तिने तिच्या मानसिक आरोग्यासाठी थेरपी देखील घेतली होती.

    आलिया म्हणाली, “मला नेहमी प्रश्न पडतो की लोक काय विचार करत आहेत. त्यांना खरंच वाटतं की मी सर्व काही चांगल्या प्रकारे हाताळत आहे, किंवा ते फक्त मला संतुष्ट करण्यासाठी हे बोलत आहेत का? कोणताही निर्णय नसला तरीही,  आपण आपल्याचं बद्दल टिकात्मक वागायला लागतो. पण मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करत होते आणि मी दर आठवड्याला थेरपीला जात होते.

    आलिया पुढे म्हणाली, “थेरपी ही एक अशी जागा आहे जिथे मी ही भीती व्यक्त करू शकते आणि हे मला समजण्यास मदत करते की ही अशी गोष्ट नाही जी मी पहिल्या किंवा पाच किंवा दहा दिवसांत समजू शकेन दररोज काहीतरी नवीन शिकण्यास सक्षम आहे आणि ते मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करेल.”