‘अ‍ॅनिमल’ सिनेमा पाहून पत्नी आलियाने पती रणबीरचं केलं कौतुक, दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी आलियाने सिनेमाबद्दल रिव्हू देत रणबीरच्या कामाचं कौतुक केलं.

    अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि अनिल कपूर यांची (Anil Kapoor) प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला. सिनेमा पाहिल्यानंतर रणबीर कपूरच्या पत्नीने अभिनेत्री आलिया भटने प्रतिक्रिया दिली आहे. एका पापाराझोने तिला चित्रपट कसा आहे असे विचारले आणि अभिनेत्रीने ‘खतरनाक!’ असे उत्तर दिले.

    रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी आलिया, तिच्या कुटुंबासह, स्क्रिनिंगला उपस्थित राहिली, यावेळी आलियाने तिच्या रणबीर कपूर-थीम असलेल्या टी-शर्टसाठी लक्ष वेधून घेतले. यावेळी आलियाने सिनेमाबद्दल रिव्हू देत रणबीरच्या कामाचं कौतुक केलं. तर, रणबीरनेही आलियाला आव्हानात्मक दृश्यांमध्ये मदत करण्याचे श्रेय दिले.

    संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’मध्ये अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासोबत विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ रिलीज झाला. दोन्ही मोठ्या चित्रपटांची आता टक्कर होणार आहे. प्रेक्षकांचा कल कोणत्या चित्रपटाकडे आहे ते येणाऱ्या दिवसातच कळेल.