Pushpa

गोल्डमाईन्स टेलिफिल्म्स प्रा.लि.ची प्रस्तुती असलेल्या ‘पुष्पा’(Pushpa) या चित्रपटाद्वारे अल्लू (Allu Arjun In Hindi Movie) हिंदीत डब केलेल्या चित्रपटात झळकणार आहे. भलेही हा तेलुगू चित्रपट हिंदीत डब करण्यात आला असला तरी अल्लूच्या चाहत्यांसाठी ही गोष्टही खूप मोठी आहे.

    आपल्या आवडत्या दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टारला(South Indian Superstar Will Be Seen In Hindi Movie) हिंदी चित्रपटात पाहण्याची इच्छा बऱ्याच फॅन्सना असते. दक्षिणेकडील कलाकारही आपल्या चाहत्यांची आवड ओळखून हिंदीकडे वळतात. हिंदीतील निर्माते-दिग्दर्शकांनाही दक्षिणेकडील कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा असते. त्यामुळं एखादा मनाजोगता प्रोजेक्ट मिळाला की दक्षिणेकडील कलाकारांची पावलं आपोआप हिंदी(Pushpa In Hindi) सिनेसृष्टीच्या दिशेनं वळतात.

    ‘बॅालिवूड वेलकम्स अल्लू अर्जुन’, ‘द मास का बाप’ आणि ‘द मोस्ट स्टायलिश आयकॅान’ अशा शब्दांमध्ये दक्षिणेकडील सुपरस्टारचं हिंदी सिनेसृष्टीत स्वागत करत ‘पुष्पा’(Pushpa Teaser) या आगामी चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांच्या सेवेत ‘पुष्पा’चा हिंदी ट्रेलर(Pushpa Hindi Trailer) रुजू होत आहे.

    गोल्डमाईन्स टेलिफिल्म्स प्रा.लि.ची प्रस्तुती असलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाद्वारे अल्लू (Allu Arjun In Hindi Movie) हिंदीत डब केलेल्या चित्रपटात झळकणार आहे. भलेही हा तेलुगू चित्रपट हिंदीत डब करण्यात आला असला तरी अल्लूच्या चाहत्यांसाठी ही गोष्टही खूप मोठी आहे. मनिष शाह निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून, १७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात अल्लूनं टायटल रोल साकारला आहे. त्याच्या जोडीला रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.