‘अमलताश’ला प्रेक्षकांची पसंती, तर दिग्दर्शकापासून अभिनेत्यांनीही केलं कौतुक!

'' हा एक असा सुंदर मराठी चित्रपट आहे, ज्याला सौम्य सिनेमॅटिक टच आहे. यातील साधेपणा प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. असं दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले.

    मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित ‘अमलताश’ ((Amaltash)) चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. आयुष्यातील विविध सुरांचे भावपूर्ण सादरीकरण करणारा हा चित्रपट अनेकांना भावतोय. प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा चित्रपट असून या चित्रपटाचे कौतुक केवळ प्रेक्षक, समीक्षकच नाही तर अनेक नामवंतही करत आहे. कलेची उत्तम जाण असणारा प्रत्येक व्यक्ती का कलाकृतीचे कौतुक करत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर ‘अमलताश’चे भरभरून कौतुक केले आहे. दिग्दर्शक रवी जाधव, निखिल महाजन, प्रकाश कुंटे, अमेय वाघ यांच्यासह अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

    दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, ” हा एक असा सुंदर मराठी चित्रपट आहे, ज्याला सौम्य सिनेमॅटिक टच आहे. यातील साधेपणा प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक पात्रात आपण नकळत गुंततो. या कथानकातील विशेष आकर्षण म्हणजे सुमधुर संगीत. प्रत्येकाने आवर्जून पाहावा.असा हा चित्रपट आहे.” तर दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ” एक सुंदर संगीत चित्रपट आहे जो खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. प्रेम, मैत्री आणि एका शहराचे मर्म इतक्या प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात चित्रपटाची संपूर्ण टीम यशस्वी झाली आहे. तर प्रकाश कुंटे ‘अमलताश’चे कौतुक करताना म्हणतात, ” चैत्राच्या आगमनाची चाहूल देऊन नावाप्रमाणेच छान फुललाय. प्रेम आणि संगीताविषयी फुललेली ही उत्कृष्ट कलाकृती चुकवू नका.” तर अभिनेता अमेय वाघ म्हणतो, ” हा चित्रपट म्हणेज भावपूर्ण सांगीतिक अनुभव आहे, जो प्रत्येकाने जरूर अनुभवावा.”

    सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.