‘बहनों और भाइयों’……बंद झाला रेडिओचा खणखणीत आवाज, अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

अनेक दशकांपासून रेडिओवर ओळखले जाणारे अमीन सयानी यांचे निधन झालंय. 'गीतमाला' या प्रसिद्ध रेडिओ कार्यक्रमासाठी त्यांची ओळख होती. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  ‘बहनों और भाईयो आप सुन रहे है…या वाक्यानं रोडिओवरील रसिक श्रोत्यांना परिचित असलेला एक खणखणीत आवाज म्हणजे अमीन सयानी. या वाक्याने गाण्यांच्या मैफिलीला चार चांद लावणारे अमीन सयानी यांच आज निधन (Amin Sayani Passed Away) झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा राजील सयानी यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.   ‘गीतमाला’ या प्रसिद्ध रेडिओ कार्यक्रमासाठी त्यांची खास ओळख होती.

  वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्नास

  राजील सयानी सांगितले की अमीन सयानी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारा दरम्यान त्यांनी प्राणज्योत मालावली.

  गीतमाला कार्यक्रमाने घराघरात प्रसिद्ध

  अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला.  त्यांनी रोडिओवर सूत्रसंचालक, उद्धोषक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज देशातील घरा घरात पोहोचला. त्यांचा गीतमाला हा कार्यक्रम हा खूप लोकप्रिय होता. प्रेक्षक त्यांच्या गीतमाला कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असत. त्यामुळे देशातील रेडिओ श्रोत्यांना जोडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. अमीन सयानी यांच्या निधनाने रेडिओ जगतात एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्याकडे स्वातंत्र्यापूर्वीच्या कथाही होत्या, ज्या ते पूर्ण रसाने सांगत असत.

  अमीन सयानी यांची सहा दशकांची दीर्घ रेडिओ कारकीर्द रेकॉर्डिंगच्या रूपात एका समृद्ध खजिन्याप्रमाणे आपल्यासमोर आहे. त्यांनी जवळपास 54 हजार रेडिओ कार्यक्रम केले होते. याशिवाय त्याने 19 हजार व्हॉईस ओव्हरही केले. अनेक जाहिरातींनाही त्यांनी आवाज दिला. अमीन सयानी यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. अमीन सयानी यांचा  ही दीर्घकाळ रेडिओची ओळख राहिली. एवढेच नाही तर आजही लोक त्यांचे रेकॉर्ड केलेले कार्यक्रम यूट्यूब सारख्या माध्यमांवर ऐकतात.