American model and fashion designer Jocelyn Cano dies after butt-lift surgery

मुंबई : अमेरिकेची मॉडेल व फॅशन डिझाईनर जोसलीन कॅनोचा वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.  सुंदर, सुडौल दिसण्यासाठी तिने बट-लिफ्ट सर्जरी केली. या सर्जरीनंतरच तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून ती ओळखली जायची.

काही दिवसांपूर्वीच तिने बट-लिफ्ट सर्जरी केली. यानंतर ७ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला आहे. बट-लिफ्ट सर्जरीसाठी जोसलीन कोलंबियाला गेली होती. मात्र, सर्जरी बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, तिच्या कुटुंबियांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. कोलंबियातील न्यूपोर्ट बीचमधील एका रहिवाशाने तिच्या अंत्यसंस्काराचे यू ट्यूबवरून लाईव्ह केले.

१४ मार्च १९९० रोजी जन्मलेल्या जोसलीनने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. ग्लॅमरस स्टाईल आणि लुकमुळे ती नेहमी चर्चेत असायची.