Amey-Khopkar

अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी नाट्य निर्मात्यांना पाठिंबा आता दिला आहे. ते स्वतः चित्रपट आणि नाट्य निर्माते आहेत. शिवाय नाट्यधर्मी निर्माता संघाचेही ते अध्यक्ष आहेत.  त्यांनी थेट बुक माय शो (Book My Show) वर निशाणा साधला आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे (Maharashtra Navnirman Chitrapat Sena) अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) मराठी चित्रपटांना कायम पाठिंबा देत असतात. अमेय खोपकर यांनी नाट्य निर्मात्यांना पाठिंबा आता दिला आहे. ते स्वतः चित्रपट आणि नाट्य निर्माते आहेत. शिवाय नाट्यधर्मी निर्माता संघाचेही ते अध्यक्ष आहेत.  त्यांनी थेट बुक माय शो (Book My Show) वर निशाणा साधला आहे.

    कोरोना काळापासून नाटकाचे तिकीट ऑनलाईन बुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेक्षक बुक माय शो साईटवर तिकीट बुक करतात, पण गेल्या काही दिवसपासून प्रेक्षक आणि निर्माते दोघांनाही अनेक अडचणी येत आहेत. नाटकांची पुरेशी माहिती न मिळणे, एरर येणे, निर्मात्यांना पैसे वेळेत न मिळणे अशा तक्रारी समोर येत होत्या. याकडे बुक माय शोकडून सुधारणा होत नसल्याने निर्मात्यांनी थेट मनसे नेत्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे.

    या प्रकरणात अमेय खोपकर यांनी स्वतः लक्ष घातले असून बुक माय शोला पत्र दिले आहे. अमेय खोपकर म्हणतात, बुक माय शो प्रणालीकडून मराठी नाट्यनिर्मात्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय, अशा तक्रारी आलेल्या आहेत. पैसे वेळेवर न मिळणं, नाटकांच्या वेळा आणि नाट्यगृहांची माहिती योग्यवेळी अपडेट न करणं, हे प्रकार बुक माय शो कडून वारंवार होतायत.यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मनसेतर्फे बुक माय शोला सध्या निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाचा मनसे पद्धतीने पाठपुरावा करू हे ठोस आश्वासन मी निर्मात्यांना देत आहे.