salman khan jee rahe the hum song

सलमान खान आणि अमाल मलिक ‘किसी का भाई किसी की जान’मधील (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) ‘जी रहे थे हम’ (Jee Rahe The Hum Song)(फॉलिंग इन लव्ह)या रोमँटिक गण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने एकिकडे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमक्या मिळत असताना सलमान खानने त्याच्या नव्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. ‘मैं हूं हीरो तेरा’ या सलमानने गायलेल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले होते. सलमान खान आता आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यासह पुन्हा आपल्या आवाजाने जादू निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आठ वर्षांपूर्वी जेव्हा सलमानने ‘हिरो’साठी गाणे गायले होते, तेव्हा अमाल मलिकने संगीतबद्ध केलेले हे गाणे रिलीज होताच ब्लॉकबस्टर ठरले होते. अशातच,आता 2023 मध्ये सलमान खान आणि अमाल मलिक ‘किसी का भाई किसी की जान’मधील (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) ‘जी रहे थे हम’ (Jee Rahe The Hum Song)(फॉलिंग इन लव्ह)या रोमँटिक गण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

निर्मात्यांनी आज ‘जी रहे थे हम’ (फॉलिंग इन लव्ह)चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या गाण्याचे व्हिज्युअल आणि ट्यून पाहून ‘किसी का भाई किसी की जान’च्या संपूर्ण अल्बममधील हे गाणं सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक असल्याचं दिसतं. यामध्ये सलमान आणि पूजा हेगडेची उत्तम ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही पाहायला मिळेल. याशिवाय राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांना देखील स्क्रीनवर पाहायला मिळेल. या गाण्यात सलमान खानच्या स्वॅगसह त्याचे डान्स मूव्ह्सही अप्रतिम आहेत.

‘किसी का भाई किसी की जान’मधील तिसरं गाणं
‘जी रहे थे हम’ (फॉलिंग इन लव्ह)हे संपूर्ण गाणं  21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘जी रहे थे हम’ (फॉलिंग इन लव्ह) हे गाणं ‘नयो लगदा’ आणि ‘बिल्ली बिल्ली’ नंतर ‘किसी का भाई किसी की जान’ अल्बममधील तिसरं गाणं आहे. हे गाणं शब्बीर अहमद यांनी लिहिले असून सलमान खानने गायले आहे.सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनमार्फत ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.