त्या झालेल्या एका अपमानानंतर आमिरने अमरीश पुरी यांच्याबरोबर कधीच काम केलं नाही कारण…

आमिर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.

    बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज यांचा वाढदिवस. २२ जून १९३२ ला जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. खरं तर हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.

    अमरीश पुरी पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारत असले तरी ख-या आयुष्यात ते  फार शांत स्वभावाचे होते. त्यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमिर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.

    ‘जबरदस्त’ वाद

    ‘जबरदस्त’ या सिनेमाच्या निमित्ताने आमिर खान आणि अमरीश पुरी यांची गाठ पडली होती. ‘जबरदस्त’ या सिनेमातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाला होता. ‘जबरदस्त’ सिनेमात अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक होता. जबरदस्त’ या सिनेमाचं दिग्दर्शन आमिरचे काका नासिर हुसेन यांनी केलं होतं. या सिनेमाच्या एका सीनचं शूटींग सुरु असताना आमिर अमरीश यांना काही सूचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमीरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु  आमिर त्यांना वारंवार सूचना करत राहिला. आमिरने लावलेला तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमिरवर संतापले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षातही आली आणि त्यांनी आमिरची माफीही मागितली. मात्र आमिर तो प्रसंग कधीच विसरू शकला नाही. त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत कधीच काम केलं नाही.