amitabh bachchan in kbc

‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये (Kaun banega Crorepati)अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan Shared Memory In KBC Program) यांनी आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला आहे.

    सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील (Sony Entertainment Television) ‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये (Kaun banega Crorepati)अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan Shared Memory In KBC Program) यांनी आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता होता आणि चिटपट उद्योगात एक अभिनेता म्हणून मान्यता मिळाल्यानंतरचा त्यांचा प्रवास कसा होता हे त्यांनी सांगितलं.

    शानदार शुक्रवारच्या भागात पाहुणे कलाकार पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी(Pankaj Tripathi And Pratik Gandhi In Kaun Banega Crorepati) यांच्याशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी एका पेट्रोल पंपवर लोक त्यांच्याकडे टक लावून पाहात असल्याचा किस्साही सांगितला.

    ते म्हणाले की, मी ‘आनंद’चं शूटिंग पूर्ण केलं होतं आणि चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्या दिवशी तो प्रदर्शित झाला, तेव्हा मी माझ्या मित्रांची कार घेऊन गेलो होतो. कारण तेव्हा माझ्याकडं कार नव्हती आणि पेट्रोल भरायला पैसेही नव्हते. मला कोणाकडून तरी ५-१० रुपये उसने घ्यावे लागले होते. ते पैसे घेऊन मी जवळच्या पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल भरून घेतलं आणि पैसे दिले. सकाळी मी दुसर्‍या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होतो आणि कारमधले पेट्रोल संपलं. मी पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो, तेव्हा तिथे चार-पाच लोक उभे होते आणि पाहात होते. दरम्यानच्या काळात ‘आनंद’ चित्रपट प्रदर्शित होऊन गेला होता, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, लोक मला ओळखू लागले आहेत आणि मी काही तरी चांगलं केलं आहे.