बिग बी म्हणाले, हा तर “परफेक्ट को-स्टार”, पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी केलं तोंडभरून कौतुक!

“जेव्हा हा को-स्टार सेटवर असतो तेव्हा सेटवरचं वातावरणंच बदलून जातं. म्हणूनच तो इथल्या सर्व महिला-पुरूष कलाकारांचा आवडता को-स्टार बनलाय.”

  महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी गुडबाय चित्रपटाचं शूटींगला सुरूवात केली आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. नुकतंच सेटवर फादर्स डे साजरा केला. यावेळी बिग बींनी त्यांच्या चित्रपटातील एका खास को-स्टारचा परिचय सोशल मीडियावरून करून दिला. या को-स्टारमुळे सेटवरील संपूर्ण वातावरणंच प्रसन्न होऊन जातं, असं देखील बिग बींनी म्हटलंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

  सेटवरील को-स्टारचा परिचय करून देण्यासाठी बिग बींनी एक फॅमिली फोटो देखील शेअर केलाय. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं, “जेव्हा हा को-स्टार सेटवर असतो तेव्हा सेटवरचं वातावरणंच बदलून जातं. म्हणूनच तो इथल्या सर्व महिला-पुरूष कलाकारांचा आवडता को-स्टार बनलाय.”

  बिग बींनी केलं कौतुक

  या चार पायाच्या को-स्टारची कामगिरी पाहून कसा आनंद वाटतोय, हे देखील बिग बींनी या पोस्टमधून सांगितलंय. हे सांगताना बिग बींनी लिहिलं, “या चार पायाच्या को-स्टारला त्याचा प्रशिक्षक चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रशिक्षण देतो आणि सेटवर तो त्याच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचीच मन जिंकून घेतो. हा एका मानवी कलाकारापेक्षाही काही कमी नाही. त्याला चेहऱ्यावरचे हावभाव कळतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला ‘फेसिंग्स’ देखील कळतं…म्हणजे कॅमेरा कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला पाहून परफॉर्मन्स करायचा आणि कॅमेऱ्याच्या कोणत्या दिशेला आपला चेहरा व्यवस्थित दिसेल हे सगळं त्याला कळतं.”