अमिताभ बच्चन यांचं नाव, आवाज आणि फोटो वापरण्यावर बंदी… दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वास्तविक, काही कंपन्या अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. जे हे करत आहेत ते चुकीचे असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

    महानायक अमिताभ बच्चन (Amitab Bachhan ) यांच्या नावातच एक वलय आहे. अभिनयासह ते त्यांच्या दमदार आवाजासाठीही ओळखळे जातात. त्यांचा आवाज, फोटो अनेक ठिकाणी वापरण्यात येतात. मात्र, आता यापुढे त्यांचं नाव, आवाज आणि फोटो विना परवानगी वापरता येणार नाही. अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या संबधी एक याचिका दाखल केली असून अनेक कंपन्या त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज आणि फोटो व्यक्तिमत्त्व वापरत असल्याचा आरोप केला आहे.

    अमिताभ बच्चन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. यानुसार आता त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांची ओळख वापरू शकणार नाह आहे. न्यायमूर्ती चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले अमिताभ बच्चन यांचे नाव, फोटो आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.  याशिवाय बच्चन यांच्या नावाचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या फोन नंबरची माहिती देण्यास कोर्टाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना सांगितले आहे. याशिवाय इंटरनेट सेवा पुरवठादारांना बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हक्क खराब करणाऱ्या ऑनलाइन लिंक्स काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे.

    अमिताभ बच्चन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याचिका मांडली. त्यांनी न्यायमूर्ती चावला यांना सांगितले की,अमिताभ यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. कोणत्याही जाहिरातीत आपले नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरले जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आली आहे.

     

    काय होतं संपूर्ण प्रकरण?

    वास्तविक, काही कंपन्या अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. जे हे करत आहेत ते चुकीचे असल्याचे याचिकेत म्हटले आहे. व्यावसायिक उद्योगात त्यांचे नियंत्रण केले पाहिजे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक लॉटरीची जाहिरातही चालू आहे, जिथे त्यांचा फोटो प्रमोशनल बॅनरवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय त्यावर KBC चा लोगोही आहे. हे बॅनर लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी तयार केले आहे. यात अजिबात तथ्य नाही.