बिग बींना लवकरच सर्वसामान्यांप्रमाणे उभं रहावं लागणार आहेत रांगेत, ब्लॉगमध्ये दिली माहिती!

बिग बींना देखील कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर यशस्वी मात केली मात्र अद्याप अमिताभ यांनी कोरोनाची लस घेतली नसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडले आहेत.

  मागील काही दिवसांपासून देशात कोरोना लसीकरण प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्प्यानं सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले आहेत. ६० वर्षावरील नागरिकांनी कोरोनाची लस घ्यायला सुरूवात केली आहे. कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनीसुद्धा या कोरोनाची लस घेतली आहे. पण, बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही.

  बिग बींना देखील कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर यशस्वी मात केली मात्र अद्याप अमिताभ यांनी कोरोनाची लस घेतली नसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडले आहेत.

  डोळ्यांवर झाली शस्त्रक्रिया

  काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या डोळ्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेबाबत माहिती देत हळूहळू आपण यातून सावरत असल्याचं म्हटलं होतं. मागील आठवड्यातच त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. खुद्द बिग बींनीच असे संकेत दिले आहेत की,  डोळ्यांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे बरी झाल्यानंतरच ते कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिली.

  ब्लॉगमध्ये म्हणतात…

  ‘व्हायरस एका वेगळ्याच प्रकारची भीती दाखवू लागला आहे. लसीकरण अनिवार्य झालं आहे आणि लवकरच मलाही रांगेत उभं राहावं लागणार आहे. पण, जेव्हा डोळा बरा होईल तेव्हा… तोपर्यंत हे जग विचित्रच आहे’.