Amitabh (9)

या वर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना 24 एप्रिल 2024 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीदिनी दिला जाणार आहे.

    गेल्या ३४ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेतर्फे चित्रपट, समाज, कला आदी क्षेत्रांशी निगडित व्यक्तींचा गौरव केला जातो. या वर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ( Lata Deenanath Mangeshkar Puraskar) बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना 24 एप्रिल 2024 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीदिनी दिला जाणार आहे. रणदीप हुड्डालाही यावर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (विशेष पुरस्कार) सन्मानित करण्यात येणार आहे.

    अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात येणार

    उल्लेखनीय आहे की, मंगेशकर कुटुंबीय गेल्या ३४ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील कलागुणांचा गौरव करत आहेत. संस्थेतर्फे आतापर्यंत 200 जणांना गौरविण्यात आले आहे. यावर्षी अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

    यादीत 11 कलाकारांची नावे आहेत

    मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- ए. आर रहमान (दीर्घ संगीत सेवा), मोहन वाघ पुरस्कार – गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्य निर्मिती 2023-23), आनंदमयी पुरस्कार – दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मिनी कोल्हापुरे (दीर्घ चित्रपट सेवा), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – रूप कुमार राठोड (दीर्घ संगीत सेवा), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती) यांना विशेष पुरस्कार. यंदा हा सन्मान सुमारे 11 जणांना देण्यात येणार आहे.