Breathe

अमेझॉन प्राइम व्हिडिओतर्फे(Amazon Prime Video) ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ (Breathe Into The Shadows) या गाजलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजचा(Webseries) नवा सीझन येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

    अमेझॉन प्राइम व्हिडिओतर्फे(Amazon Prime Video) ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ (Breathe Into The Shadows) या गाजलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजचा(Webseries) नवा सीझन येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या सीझनमध्ये अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan), अमित साध(Amit Sadh), नित्या मेनन(Nitya Menan) आणि संयमी खेर(Sayyami Kher) यांच्या प्रमुख भूमिका असून या सिक्वेलमध्ये नवीन कस्तुरीया या गुणी कलाकाराचीही भर पडली आहे.

    ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही वेबसीरिज अबन्डन्शिया एन्टरटेन्मेंट यांनी क्रिएट आणि निर्मिती केली आहे. याचं दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं असून नव्या सीझनची निर्मिती दिल्ली आणि मुंबईत सुरू झाली आहे. २०२२ मध्ये २४० हून अधिक देश व प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर लाँच करण्याची योजना आहे.

    याबाबत प्राइम व्हिडियोच्या, ओरिजिनल्स विभागाच्या हेड अपर्णा पुरोहित म्हणाल्या की, ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ या शोची लोकप्रियता आणि त्याविषयीची उत्कंठा यामुळं नवा सीझन येणं साहजिकच होतं. दुसऱ्या सीझनचा प्लॉट आणखी गंभीर होत जातो आणि या कथानकात नव्या व्यक्तिरेखा आपल्या ऊर्जेची भर टाकत उत्कंठा वाढवतात. त्यामुळं या सीझनमधील व्यक्तिरेखांनी खेळलेला आयुष्याचा जुगार आणि थरारही अधिक तीव्र आहे. या पुरस्कार विजेत्या फ्रन्चाइझीचा नवा सीझन जाहीर करणं हे भारतीय मातीत रुजलेल्या आणि खिळवून ठेवणाऱ्या कथा विकसित करून आणि त्या प्रदर्शित करण्याप्रती असलेल्या आमच्या प्रतिबद्धतेचं द्योतक आहे, ज्या सर्व भौगोलिक सीमा ओलांडतात.