amruta khanvilkar

इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स (Indian Television Academy Awards) १ जानेवारी २०२३ रोजी रात्री ७:३० वाजता फक्त स्टार प्लसवर दाखवण्यात येणार आहेत. या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) लावणी नृत्य सादर करताना दिसणार आहे.

    मुंबईत नुकताच २२ वा इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्स (Indian Television Academy Awards) सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलीवूड आणि टेलिव्हिजन उद्योगाला एकत्र आणून छोटा पडदा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला. अनेक प्रतिभावंतांच्या प्रतिभांचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याचे प्रसारण नव्या वर्षात १ जानेवारीला स्टार प्लसवर होणार आहे.

    या सोहळ्यात अभिनेत्री रुपाली गांगुलीपासून हर्षद चोपडा, नील भट्ट, शिवांगी जोशी यांच्या बहारदार परफॉर्मन्समुळे इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्सचा घोषणेपासूनच बोलबाला आहे. यामध्ये आणखी एक मराठमोळे नाव जोडले गेले ते म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर हीचे. तिने आपल्या बहारदार लावणी नृत्याने या सोहळ्यात अनोखे रंग भरले. अमृताने ‘लेके आयी हूं मैं इश्क का नजराना’ या गाजलेल्या लावणीवर आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने नृत्य साज चढवला. येत्या नवीन वर्षात प्रेक्षक इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्सच्या स्टार प्लसवर होणाऱ्या टेलिव्हिजन प्रसारणासाठी उत्सुक आहेत.

    इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स १ जानेवारी २०२३ रोजी रात्री ७:३० वाजता फक्त स्टार प्लसवर दाखवण्यात येणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, पुनरागमन करणारी आघाडीची टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी, भारतातील आवडते जोडपे- अनुपमा आणि अनुज यांच्यासह इतर अनेकांच्या अनोख्या कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा.