amruta khanvilkar

ॲगल्फ न्यूज टॅबलॉइडॅच्या पहिल्या पानावर अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) फोटो झळकला आहे. या मॅगझिनमध्ये तिच्याविषयी एक लेख छापून आला आहे. अमृताने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे. 

  ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) सिनेमा सध्या खूप गाजत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) या चित्रटामध्ये मुख्य पात्र असलेल्या चंद्रमुखीची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील चंद्रा हे गाणं लोकप्रिय झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेत्री अमृता खानविलकरचा फोटो युएईतील एका प्रसिद्ध मॅगझिनवर (Amruta Khanvilkar On UAE Magazine Cover Page) झळकला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)


  ॲगल्फ न्यूज टॅबलॉइडॅच्या पहिल्या पानावर अमृता खानविलकरचा फोटो झळकला आहे. या मॅगझिनमध्ये तिच्याविषयी एक लेख छापून आला आहे. अमृताने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे.  याआधीदेखील ती फिल्मफेअरच्या डिजिटल कव्हरवर झळकली होती. फिल्मफेअरच्या डिजिटर कव्हर पेजवर झळकणारी अमृता ही पहिली मराठी अभिनेत्री आहे.

  चंद्रमुखी हा सिनेमा २९ एप्रिलला रीलिज झाला. हा सिनेमा काहीच दिवसात सुपरहिट ठरला आहे. सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत.