सोशल मीडियावर कमेंट्स आणि ट्रोलिंग करणाऱ्यांविरुद्ध अमृता खानविलकरने व्यक्त केला संताप

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) नेहमीच तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. अमृता नेहमी तिच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. अभिनेत्रींना अनेकदा सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत.

  प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) नेहमीच तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. अमृता नेहमी तिच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. अभिनेत्रींना अनेकदा सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत. काही वेळास कलाकारांना ट्रोल केल्यानंतर ते दुर्लक्षित करतात. मात्र अमृता खानविलकरने संताप व्यक्त केला आहे. एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती बोलणार..किती बोलणार? आणि त्याला काही सीमा का नाहीये? असा प्रश्न विचारताना फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे , असे म्हणत अमृताने ट्रोलर्स, आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

  अमृता खानविलकर ही नेहमीच तिच्या सोशल मीडियावर अक्टिव्ह असते. अमृता तिचे फोटो आणि आगामी प्रोजेक्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच गुढीपाडवा हा सण अमृताने साजरा केला. मात्र तिने दुसऱ्या दिवशी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.तिच्या या पोस्स्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनय या क्षेत्रामध्ये असल्याने चांगलं वाईट ऐकण्याची सवय झाली आहे. पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते, असे अमृता खानविलकरने म्हंटले आहे.

  अमृताने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले आहे…

  आशा करते की तुमचा गुढीपाडवा छान गेला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केली असेल ना. नवीन मनोकामना. नवी स्वप्ने. देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार.

  जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी देखील हेच केलं. कारण मी हि फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे. संस्काराने मराठी आहे. मूळची कोकणातीलपण जन्म मुंबई चा आहे. मी हि कोणाची तरी मुलगी आहे. बहीण आहे ,मावशी आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, बायको आहे मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे.

  तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळे interviews देत आहे. वेग वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर. आता ह्या क्षेत्रात असल्या मुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रॉलिंग च्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात कि लाज वाटते. वेषभूशा असो, हसणं असो, बोलणं असो, एका स्त्री च्या प्रतेय्क गोष्टी वर किती, किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं नाव किंव्हा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडिया चा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये.पण ह्या वर जे तुम्ही लिहिता बोलता यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात
  असो.

  मी normally ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करतेच …. पण कधी कधी समोरच्या ला हे सांगणं गरजेचं असतं कि गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे
  अमृता खानविलकर, असे लिहत अमृताने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.