समुद्राच्या मधोमध होणार अनंत राधिकाचं दुसरं प्री वेडिंग सेलेब्रेशन, 800 पाहुणे क्रूझ जहाजावर करतील धमाल!

अनंत आणि राधिका मर्चंटच प्री वेडींग सेलिब्रेशन मार्च महिन्यात जामनगरमध्ये झालं होत. आता दुसरं सेलेब्रेशन सातासमुद्रापार होणार आहे.

  देशातीन प्रसिद्ध उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani)आणि राधिका मर्चंट (Radhika Merchent) यांची लग्न घटिका समीप येत आहे. जुलै महिन्यात हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या घरात लग्नाच्या तयारीला आतापासून सुरुवात झाल्याचं दिसत आहे. मार्च महिण्यात गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत राधिकाचा प्री वेडींग सोहळा पार पडला होता. या दिमाखदार सोहळ्याला जगभरातील सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती.  आता त्यांच्या लग्नाचं दुसरं प्री वेडींग कार्यक्रम पार पडणार आहे. पण यावेळी तो भारतात न होता सातासमुद्रापार क्रूझ जहाजावर होणार आहे. कसं असणार त्यांचं प्री वेडींग सेलेब्रेशन, काय काय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे, ते जाणून घ्या.

  ‘या’ ठिकाणी होणार अनंत राधिकाचं प्री वेंडीग सेलेब्रेशन

  मुकेश अंबानीचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग सेलेब्रेशन बद्दल नवी अपडेट समोर आली आहे.  अनंत राधिकाच्या लग्नाची वाट पाहणाऱ्यांना आता त्याचं दुसरं प्री वेडींग पाहायला मिळणार आहे. त्यांच प्री वेडींग समुद्राच्या मधोमध क्रूझ जहाजावर होणार आहे. या सेलेब्रेशनमध्ये 800 लोकांना बोलवण्यात येईल.  हे क्रूझ जहाज इटलीच्या सिटीपोर्ट मधून निघून फ्रान्समध्ये जाऊन थांबणार.

  28 ते 30 मे दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन

  अनंत आणि राधिकाच्या प्री वेडींग सोहळ्याबद्दल नवनवीन माहीती समोर येत आहे. त्यांच हे प्री वेडींग 28 ते 30 मेपर्यंत चालणार असून,  या दरम्यान हे हे क्रूझ जहाज 4380 किमी यात्रा करणार आहे.  जहाजावरील 800 पाहुण्यांना काय हवं नको ते पाहण्यासाची तब्बल 600 लोकांचा स्टाफ राहणार आहे.
  या सेलेब्रेशनमध्ये अंबानी कुटुंबियांचे अगजी खास पाहुणे येणार आहेत. रिपोर्टनुसार,  बॅालिवुडमधऊन तिन्ही खान येणार असून बच्चन आणि कपूर कुटुंबिायही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या शिवाय जगभरातील मनेरंजन, व्यवसाय क्षेत्रातील लोकंही उपस्थित राहणार आहेत.

  जामनगरमध्ये झालं पहिलं सेलेब्रेशन

  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबतचं प्री वेडींग सेलेब्रेशन यापुर्वी 1 ते 3 दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला जगभरातील सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. आता त्यांच्या दुसऱ्या प्री वेडींग फंक्शन बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सकता बघायला मिळत आहे.