अनन्या पांडेची NCB कडून चार तास चौकशी, सोमवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश

एनसीबीने अनन्याची चौकशी केली असता ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबतचे अनेक चॅट समोर आले आहेत. यामध्ये एनसीबीने मोठे खुलासे केले आहेत. एनसीबीकडून अनन्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. आर्यन खानसोबत ड्रग्ज संदर्भात काही व्हॉट्स अँप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले होते.

    मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची आज(शुक्रवार) चौकशी करण्यात आली. अनन्याला चौकशीसाठी दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. वडील चंकी पांडे सुद्धा अनन्यासोबत एनसीबी कार्यालयात हजर राहीले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून अनन्याची सलग चार तास चौकशी करण्यात आली आहे. परंतु पुन्हा एकदा तिला 25 ऑक्टोबर रोजी  एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, काल (गुरूवार) दोन तास अनन्याची चौकशी करण्यात आली होती.

    एनसीबीने अनन्याची चौकशी केली असता ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबतचे अनेक चॅट समोर आले आहेत. यामध्ये एनसीबीने मोठे खुलासे केले आहेत. एनसीबीकडून अनन्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. आर्यन खानसोबत ड्रग्ज संदर्भात काही व्हॉट्स अँप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले होते.

    एनसीबीला आतापर्यंत आर्यन आणि अनन्या यांच्या व्हॉट्स अँप चॅट्स मिळाले असले, तरी अनन्याने आर्यनला ड्रग्ज पेडलरचे नंबर दिले असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही. सोमवारी पुन्हा पांडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती NCB चे डीजी अशोक जैन यांनी दिली आहे.