ak-vs-ak-anil-kapoor

अभिनेता अनिल कपूर AK VS Ak या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी अनिल कपूर यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मात्र त्यांच्या एका उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.

अनिल कपूर यांना एका चाहतीने गुजरातीमध्ये प्रश्न विचारला. पण अनिल कपूर यांनी गुजराती प्रश्नाला थेट मराठीत उत्तर दिलं. युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं.

यानंतर तीने अनिल कपूर यांची मुलाखत घेण्याची इच्छा बोलून दाखवली. हा व्हिडीओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.

अनिल कपूर यांनी या ट्विटला उत्तर देताना गुजराती तसेच इंग्रजीमधून बोलणाऱ्या अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला कधीही बोलवा मी कधीही येईन” असं उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं. मात्र त्यावर अदितीने मला ही भाषा समजत नाही असं उत्तर दिलं होतं.

अनिल कपूर यांच्या मराठी चाहत्यांनी अदिती गुजराती असल्याने ती गुजराती भाषेतून चित्रपटांचे परिक्षण करते. त्यामुळे मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी तिला मराठीत उत्तर दिल्याचं या ट्विटला रिप्लाय करुन म्हटलं आहे.