
अनिल कपूर (Anil Kapoor)आता आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी सोनमने मुलाला जन्म दिला. सोनमने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. काही फोटो सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात अनिल कपूर आणि नातू वायू यांचा फोटो विशेष लक्षणीय आहे. नातवासोबतच्या फोटोतही त्यांचा फिटनेस आजही चांगला आहे हे दिसून येत आहे.
अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी आजपर्यंत केलेल्या चित्रपटातल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. नुकताच त्यांना ‘थार’ मधील अभिनयाबद्दल फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. लूक आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीत सध्याच्या कोणत्याही हिरोला मात देऊ शकतील अशा अनिल कपूर यांचा जन्म 1956 मध्ये झाला. अनिल कपूर (Anil Kapoor Birthday) आज ६६ वर्षांचे झाले आहेत. मात्र आजही ते जिममध्ये 2 तास व्यायाम करतात. सायकलिंग, जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून ते आजही स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात.
अनिल कपूर स्वत:च्या फिटनेसबाबत खूप अलर्ट आहेत. ते रोज 2 तास व्यायामाचं तंत्र पाळतातच शिवाय ते आहाराबाबतीतही काही नियम नेहमी पाळत असतात. ते दिवसातून पाच ते सहा वेळा थोडं थोडं काहीतरी खात असतात. ते साखर आणि जंक फूडचं सेवन करत नाहीत. चहा- कॉफीच्या जागी ते स्ट्रॉबेरी मिल्क शेक पितात. त्यांच्या आहारत नेहमी ब्रोकोली, डाळ आणि ब्राऊन राईसचा समावेश असतो. दिवसाच्या पहिल्या आहारात ते केळं आवर्जून खातात.
View this post on Instagram
अनिल कपूर आता आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी सोनमने मुलाला जन्म दिला. सोनमने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. काही फोटो सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात अनिल कपूर आणि नातू वायू यांचा फोटो विशेष लक्षणीय आहे. नातवासोबतच्या फोटोत त्यांचा फिटनेस आजही चांगला आहे हे दिसून येत आहे.
अनिल कपूर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक फिल्म्स हिट केल्या. मात्र त्यांचं बालपण तितकं सुंदर नव्हतं. त्यांचे वडील सुरिंदर कपूर पृथ्वीराज थिएटरमध्ये काम करायचे. फारसे पैसे नसल्याने त्यांचं संपूर्ण कुटुंब एका खोलीत राहायचं. उत्पन्न कमी असतानाही अनिल यांच्या वडिलांनी सगळ्या मुलांच्या गरजा पूर्ण केल्या. कालांतराने त्यांचे वडील दिग्दर्शक बनले.
वडील आजारी पडल्यानंतर अनिल यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी पहिली नोकरी स्पॉटबॉय म्हणून केली होती. तेलुगू चित्रपटापासून त्यांनी अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रत्येक भूमिकेसाठी, त्या भूमिकेच्या लूकसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. जेव्हा त्यांनी कामाला सुरुवात केली तेव्हा त्यांना फक्त 201 रुपये मानधन मिळालं होतं. मात्र आज ते 134 कोटींचे मालक आहेत. बॉलीवूडच्या या फिट आणि झकास अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.