ट्रोलिंगचा सामना तरीही ‘अ‍ॅनिमल’ने रचला इतिहास! ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा; ‘पठाण’, ‘जवान’,’दंगल’चा मोडला रेकॉर्ड

दिवसेंदिवस सिनेमाच्या कमाईचा आलेख वाढताना दिसत आहे. दहाव्या दिवशी 37 कोटींचा व्यवसाय केला आहे.

  अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा होऊन रिलिज होऊन 10 दिवस झाले आहेत. सोशल मीडियावर सिनेमाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिसाद बघायला मिळत आहे. तरीही रणबीरच्या फॅन फॅोलोविंगवर त्याचा फारसा फरक पडत दिसत नसल्याचं दिसत आहे. त्यात भर म्हणजे सिनेमातील रणबीरच्या काही संवादावर आक्षेप घेतला जात आहे, त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तरीही सिनेमाच्या लोकप्रियतेवर काही फरक पडलेला दिसत नाही आहे. सिनेमाच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनचा (Animal Box Office Collection) हा आलेख वाढतानाचं दिसत आहे. रविवारी दहाव्या दिवशी म्हणजे सुटीच्या दिवशीही सिनेमानं बॅाक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे.

  अ‍ॅनिमल सिनेमा रिलिज झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सिनेमाचा बॅाक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करताना दिसत आहे.  प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता सिनेमाचे शो टाईमही वाढवण्यात आलं आहे. त्याचा पुरेपुर फायदा सिनेमाला होताना दिसत आहे. दिवसेंदिवस सिनेमाच्या कमाईचा आलेख वाढताना दिसत आहे. दहाव्या दिवशी 37 कोटींचा व्यवसाय केला आहे.

  अ‍ॅनिमलचं आतापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन

  अ‍ॅनिमल हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 72.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 39.9 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी मंगळवारी  37.47 कोटी आणि बुधवारी सहाव्या दिवशी  30.39 कोटींची कमाई केली. सातव्या दिवशी 25.50  कोटींचा व्यवसाय केला आहे.आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने 432.27 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 660 कोटींची कमाई केली आहे.

  अ‍ॅनिमल चित्रपटाची स्टारकास्ट

  अ‍ॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओ

  ल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे,  हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.