अ‍ॅनिमलचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन झालं कमी, सोळाव्या दिवशी कमावले 13 कोटी !

पंधराव्या दिवशी 7.5 कोटी कमाई केली. एकंदरीत या चित्रपटाने जगभरात 797.6 कोटींची कमाई केली आहे.

    अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. सिनेमाबद्दल सोशल मीडियावर सिनेमाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिसाद बघायला मिळत आहे. तरीही रणबीरच्या फॅन फॅोलोविंगवर त्याचा फारसा फरक पडत दिसत नसल्याचं दिसत आहे. त्यात भर म्हणजे सिनेमातील रणबीरच्या काही संवादावर आक्षेप घेतला जात आहे, त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तरीही सिनेमाच्या लोकप्रियतेवर काही फरक पडलेला दिसत नाही आहे. मात्र, शुक्रवारी पंधराव्या दिवशी सिनेमाचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन कमी झालं असून चित्रपटाने 7.5 कोटींची कमाई केली होती. तर शनिवारी सिनेमानं 13 कोटी कमवले आहेत. 

    अ‍ॅनिमलचं आतापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन

    अ‍ॅनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 ला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 72.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 39.9 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी मंगळवारी  37.47 कोटी आणि बुधवारी सहाव्या दिवशी  30.39 कोटींची कमाई केली. सातव्या दिवशी 25.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. तर अकराव्या दिवशी 13.85 कोटींंची कमाई केली आहे. बाराव्या दिवशी  13 कोटींची कमाई केली आहे. तेराव्या दिवशी चित्रपटाने 10 कोटी कमावले तर 14 दिवशी 8.75 कोटी कमाई केली.गुरुवारी चौदाव्या दिवशी चित्रपटानं बॅाक्स ऑफिस कलेक्शन कमी झालं असून चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई केली आहे. पंधराव्या दिवशी चित्रपटानं  7.5 कोटींची कमाई केली आहे. तर, सोळाव्या दिवशी चित्रपटानं 13 कोटींची कमाई केली.

    अ‍ॅनिमल चित्रपटाची स्टारकास्ट

    अ‍ॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे, हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.