Animal (1)

पहिल्या दिवशी सिनेमानं 63.8 कोटी कमावले तर दुसऱ्या दिवशी जवळपास 66 कोटी कमावले आहेत.

    अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज झाला. सिनेमालाही चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असळ्याचं दिसत आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी तब्बल 91 कोटी कमावले. आता सिनेमाचं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. जाणून घ्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमावले.

    दुसऱ्या दिवशी किती कमावले

    रणबीर कपूरच्या सिनेमा बॅाक्स ऑफिसवर सुसाट सुटल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवशी सिनेमानं जबरदस्त कमाई केली. पहिल्या दिवशी सिनेमानं 63.8 कोटी कमावले तर दुसऱ्या दिवशी जवळपास 66 कोटी कमावले आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसात हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला असून एकूण 129.80 कोटी कमावले आहे.

    पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई ?

    रणबीरच्या अ‍ॅनिमलला मोठ्या ओपनिंगची अपेक्षा होती आहे. पहिल्या वीकेंडला हा सिनेमा किमान १०० कोटींची कमाई करेल, असा विश्वास ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला होता आणि हा विश्वास खरा ठरताना दिसत आहे. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास 60 कोटींची कमाई केली .

    यापैकी हिंदीतील सिनेमाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. तर तमिळमध्ये 40 लाख रुपये, कन्नडमध्ये 9 लाख रुपये आणि मल्याळममध्ये 1 लाख  रुपयांची कमाई केली आहे. एकंंदरीत’अ‍ॅनिमल’ची जगभरात 100 कोटींची ओपनिंग झाली आहे.

    अ‍ॅनिमल चित्रपटाची स्टारकास्ट

    अ‍ॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे,  हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.