रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई!

हिंदीतील चित्रपटाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे

  अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज झाला. ट्रेलरला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळल्यानंतर आता सिनेमालाही  चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅनिमलने रिलीजआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई (Animal Advance Booking) केली आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर सिनेमाला फायदा झाल्याचं दिसत आहे. सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. जाणून घेऊया रणबीर कपूरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले.

  पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘इतकी’ कमाई?

  रणबीरच्या अ‍ॅनिमलला मोठ्या ओपनिंगची अपेक्षा होती आहे. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट किमान १०० कोटींची कमाई करेल, असा विश्वास ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला होता, आणि हा विश्वास खरा ठरताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास 60 कोटींची कमाई केली आहे.

  यापैकी हिंदीतील चित्रपटाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकंंदरीत’अ‍ॅनिमल’ची जगभरात 100 कोटींची ओपनिंग झाली आहे.

  अ‍ॅनिमल चित्रपटाची स्टारकास्ट

  अ‍ॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे,  हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.