अ‍ॅनिमलची पहिल्या दिवशी सुपर ओपनिंग! पण सिनेमा फुल एचडी प्रिंटमध्ये लीक; विनामूल्य डाउनलोड करुन बघताहेत लोकं

  अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज झाला. ट्रेलरला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळल्यानंतर आता सिनेमालाही  चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅनिमलने पहिल्या दिवशी किती 60 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर  टिममध्ये आनंद असताना आता मात्र, आता त्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलीजच्या 24 तासांनंतर, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.

  ऑनलाइन लीक झाला आहे ‘अ‍ॅनिमल’

  ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांत फुल एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट टेलिग्राम, TamilRockers, Movierulz, TamilMV, FilmyZilla, Ibomma सारख्या टोरेंट वेबसाइटवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. मनोरंजन पोर्टलचा दावा आहे की हा चित्रपट नियमित फॉरवर्डप्रमाणे व्हाट्सएपवर देखील शेअर केला जात आहे. मात्र, केवळ अॅनिमलच नाही तर विकी कौशलचा सॅम बहादूर देखील रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला होता.

  पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘इतकी’ कमाई?

  रणबीरच्या अ‍ॅनिमलला मोठ्या ओपनिंगची अपेक्षा होती आहे. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट किमान १०० कोटींची कमाई करेल, असा विश्वास ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला होता, आणि हा विश्वास खरा ठरताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास 60 कोटींची कमाई केली आहे.

  यापैकी हिंदीतील चित्रपटाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकंंदरीत’अ‍ॅनिमल’ची जगभरात 100 कोटींची ओपनिंग झाली आहे.

  सिनेमाची स्टारकास्ट

  अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट काल म्हणजेच १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. सिनेमाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून हा चित्रपट हिंदी तसेच तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे.