‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या मंचावर सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत अंकिता लोखंडे झाली भावूक, पहा व्हिडिओ

2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. आजही त्याच्या आठवणीने चाहते भावूक होतात.अभिनेत्री अंकिता लोखंडेचे सुशांतसोबत खूप जवळचे नाते होते. दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे खूपच भावूक दिसत आहे.

  ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या टीव्ही शोचा आगामी भाग ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेवर आधारित असेल. या विशेष भागात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि मालिकेतील प्रमुख अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. शो प्रसारित होण्यापूर्वी चॅनलने प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या मंचावर उपस्थित असलेले सर्वजण यावेळी भावूक झाले. या स्पेशल एपिसोडमध्ये स्पर्धकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या अंकिता आणि उषा सुशांतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक झाल्या.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZEE TV (@zeetv)

  सुशांतला श्रद्धांजली वाहताना एका स्पर्धकाला नाचताना पाहून अंकिता आपल्या भावना आवरू शकली नाही आणि सेटवर रडू लागली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतच्या आईची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही या शोमध्ये उपस्थित होती. सुशांत आणि उषा नाडकर्णी यांचीही चांगलीच बॉन्डिंग होती. यावेळी उषा नाडकर्णी यांनाही सुशांतच्या आठवणीत आपले अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अंकिता लोखंडे म्हणाली, “तो खूप जवळचा मित्र होता… तो माझ्यासाठी सर्वस्व होता आणि तो जिथे असेल तिथे तो खूप आनंदी असेल… देव त्याला नेहमी आनंदी ठेवो.”