
अंकिता पुढे म्हणाली की, ती यासाठी सुशांतला ब्लेम करीत नाही. मात्र ट्रोलिंगमुळे ती खूप त्रस्त झाली आहे.अनेकजण मला सुशांतसोबत ब्रेकअप केल्याबद्दल वाईट बोलतात.
सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेला खूप ट्रोल केलं. अनेकदा सोशल मीडियावर अंकिताच्या पोस्टवर सतत सुशांतच्या मृत्यूवरून, ब्रेकअपवरून बोललं जातं. अनेकदा दोघांच्या ब्रेकअपसाठी अंकिताला ब्लेम केलं जातं. आता अंकिताने एका मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने ब्रेकअपबद्दलही आपली भूमिका मांडली आहे आणि ट्रोल करणाऱ्यांची तोंडं बंद केली आहेत.
View this post on Instagram
अंकिता म्हणाली की, तिने सुशांतसोबत ब्रेकअप केलं नव्हतं, तर सुशांतनेच तिला सोडलं होतं. अंकिता पुढे म्हणाली की, ती याबाबत आतापर्यंत काहीच बोलली नाही. याचा तमाशा करायचा नसल्याने तिने आतापर्यंत काही खुलासा केला नव्हता, असंही ती म्हणाली. अंकिता पुढे म्हणाली की, ती यासाठी सुशांतला ब्लेम करीत नाही. मात्र ट्रोलिंगमुळे ती खूप त्रस्त झाली आहे.
View this post on Instagram
पुढे बोलताना ती म्हणाली, अनेकजण मला सुशांतसोबत ब्रेकअप केल्याबद्दल अनेकजण वाईट बोलतात. सुशांत आपल्या निवडीबाबत खूप स्पष्ट होता. तो आपल्या करिअरसोबत पुढे जाऊ इच्छित होता. त्याने आपलं करिअर निवडलं आणि तो निघून गेला. मात्र पुढील दोन ते अडीच वर्षे माझ्यासाठी खूप त्रासदायक होती. माझ्यासाठी यातून बाहेर पडणं अवघड होतं. मात्र माझं कुटुंब कायम माझ्या पाठीशी उभं राहिलं.
View this post on Instagram