ankita lokhande and vicky jain

अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत विवाहबंधनात अडकणार(Ankita Lokhande To Tie The knot With Vicky Jain) असल्याची माहिती मिळाली आहे.

    बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. विकी आणि कतरिना तसेच आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत विवाहबंधनात अडकणार(Ankita Lokhande To Tie The knot With Vicky Jain) असल्याची माहिती मिळाली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

    गेल्या काही वर्षांपासून अंकिता विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. यातच आता अंकिता आणि विक्की लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अंकिता आणि विक्कीने लग्नासाठी तारीख ठरवलेली नाही. मात्र १२, १३ आणि १४ डिसेंबरला दोघ लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे.अंकिता आणि विक्की जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.