‘मेगा ब्लॉकबस्टर’चं आणखी एक पोस्टर रिलीज, दीपिका पादुकोण कॉमेडियन कपिल शर्मासोबत दिसणार एकत्र

'मेगा ब्लॉकबस्टर'चं आणखी एक पोस्टर रिलीज झालंय. दीपिका पदुकोण कॉमेडियन कपिल शर्मासोबत काम करणारे.

  ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटाच्या घोषणेसोबतच यामध्ये दिसणारे कलाकारांचे पोस्टर्स रिलीज करण्यात आलेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, कपिल शर्मा, सौरव गांगुली, रोहित शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारेत. एकापाठोपाठ एक चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचलायं. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही ‘मेगा ब्लॉकबस्टर’ सोबतची आपली भागीदारी जाहीर करत चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. हे पोस्टर रिलीज होताच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले – सरप्राईज! #TrailerOut4thSept #MegaBlockbuster

  ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर ४ सप्टेंबरला रिलीज होणारे. बरं, या पोस्टर्समागील सत्य समजून घेण्यासाठी चाहत्यांना तोपर्यंत वाट पाहावी लागेल असं दिसतयं. पहा दीपिकाने पोस्ट केलेले पोस्टर-

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर शेअर केलायं. 4 सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तेच शेअर करत गांगुलीने लिहिले, “शूटिंग करताना मजा आली! नवीन मेगा ब्लॉकबस्टर लवकरच रिलीज होत आहे! #TrailerOut4thSept #MegaBlockbuster