antim the final truth

‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटाची (Antim The Final Truth) प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून, सलमान खान, आयुष शर्मा आणि दिग्दर्शक, महेश मांजरेकर यांच्यासह संपूर्ण टीम प्रमोशनसाठी पुण्याला (Antim The Final Truth Team In Pune) जाण्यासाठी सज्ज झाली आहे.

    ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ (Antim The Final Truth)या या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान(Salman Khan) अभिनित या चित्रपटामध्ये आयुष शर्मा देखील तितक्याच दमदार भूमिकेत असणार असून हा चित्रपट ३ दिवसात प्रदर्शित होणार आहे. या मेगास्टारचे चाहते त्यांच्या लाडक्या स्टार्सना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी श्वास रोखून वाट पाहत आहेत.

    आता प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून, सलमान खान, आयुष शर्मा आणि दिग्दर्शक, महेश मांजरेकर यांच्यासह संपूर्ण टीम प्रमोशनसाठी पुण्याला (Antim The Final Truth Team In Pune) जाण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण त्यांनी या शहरात चित्रपटासाठी अनेक दृश्ये शूट केली आहेत. झी स्टुडिओजद्वारे येत्या २६ नोव्हेंबरला ‘अंतिम’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

    सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना अभिनीत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ महेश मांजरेकर दिग्दर्शित, सलमा खान निर्मित आणि सलमान खान फिल्म्स प्रस्तुत चित्रपट आहे.