खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ते…अनुपम खेर यांच नदाव लॅपिड यांना प्रत्यु्त्तर

विवेक अग्निहोत्रींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटावर नदाव लॅपिड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून आता पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.

    ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित झाल्यापासूनच चांगलाच वादात होता. चित्रपट प्रदर्शित होउन नऊ महिने झाल्यानंतर आता पुन्हा एकदा हा चित्रपटगृह चर्चेत आहे. IFFI मध्ये ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्याला अभिनेते अनुपम खेर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

    अनुपम खेर यांचं प्रत्तुत्तर

    विवेक अग्निहोत्रींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटावर नदाव लॅपिड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून आता पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराला सर्वांसमोर उजाळा देणारा हा चित्रपट असभ्य आणि अपप्रचारावर आधारित असल्याचं त्यांनी म्हण्टयं. अनुपम खेर नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध करत  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते..’ इतकंच नाही तर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांना योग्य उत्तर देऊ. ज्यूंचा नरसंहार खरा असेल, तर काश्मिरी पंडितांचे निर्गमनही खरे आहे. टूलकिट टोळी सक्रिय झाल्यानंतर लगेचच हा प्रकार घडला, हे पूर्वनियोजित असल्याचे दिसते. त्यांनी असे वक्तव्य करणे लज्जास्पद आहे. होलोकॉस्टचा सामना करणार्‍या ज्यू समुदायातून आलेल्या, असे विधान केल्याने अनेक वर्षांपूर्वी शोकांतिका सहन करणार्‍यांनाही वेदना झाल्या आहेत. हजारो आणि लाखो लोकांच्या शोकांतिकेचा उपयोग तो आपला अजेंडा पूर्ण करण्यासाठी करू नये म्हणून देव त्याला बुद्धी देवो. अशा शब्दात त्यांनी नदाव लॅपिड याना चांगलेच सुनावले.

    अनुपम खेर यांच ट्विट