anupam kher in tiger nageshwar rao

अनुपम खेर (Anupam Kher) तब्बल ३५ वर्षांनंतर एका तेलुगू चित्रपटामध्ये काम करणार आहेत. ‘द काश्नीर फाईल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांची निर्मिती असलेला ‘टायगर नागेश्वर राव’ (Tiger Nageswara Rao) हा चित्रपट तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज होणार आहे.

    बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपल्या ५२८ व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा एक तेलुगू चित्रपट आहे ज्यात अनुपम खेर यांची महत्त्वाची भूमिका बघायला मिळणार आहे. ‘द काश्नीर फाईल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांची निर्मिती असलेला ‘टायगर नागेश्वर राव’ (Tiger Nageswara Rao) हा चित्रपट तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज होणार आहे. अनुपम खेर तब्बल ३५ वर्षांनंतर एका तेलुगू चित्रपटामध्ये काम करणार आहेत. याआधी त्यांनी १९८७ मध्ये आलेल्या ‘त्रिमुर्तुलु’ या चित्रपटात डॉनची भूमिका निभावली होती.

    ‘टायगर नागेश्वर राव’मधील अनुपम खेर यांचा लूकही समोर आला आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत ते लिहितात की, ‘माझा ५२८ वा चित्रपट तेलुगूमध्ये येणार आहे. या चित्रपटाच्या टीमच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टॅलेंट आहे. ’ अनुपम यांच्या आधी या चित्रपटातील रवि तेजा यांचा लूकही समोर आला होता.

    ‘टायगर नागेश्वर राव’ एक बायोपिक आहे. एका चोरावर आधारित ही कथा आहे. सत्तरच्या दशकातलं वातावरण या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये अनुपम खेर आणि रवि तेजा व्यतिरिक्त नुपूर सेनन आणि गायत्री भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका आहेत.