५१८ सिनेमांमध्ये काम करूनही अनुपम खेर यांना ‘त्याने’ ओळखलच नाही, धम्माल VIDEO सोशल मीडियावर होतोय व्हायरल!

आपल्या मूळ गावी म्हणजेच सिमलामध्ये अनुपम खेर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी एक मजेशीर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

  अभिनेते अनुपम खेर यांची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर जगभऱात पसरली आहे. आजवर अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे अनुपम खेर यांच्यापुढे आता डबक्यात बुडून मरावं की काय असा प्रश्न पडला. अनुपम खेर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत सिमला इथं निवातं वेळ घालवत आहेत. मात्र इथं अनुपम खेर यांची एका अशा व्यक्तशी गाठ पडली ज्या व्यक्तीने दिग्गज अभिनेता असूनही अनुपम खेर यांना ओळखलं नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anupam Kher (@anupampkher)

  आपल्या मूळ गावी म्हणजेच सिमलामध्ये अनुपम खेर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी एक मजेशीर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत अनुपम खेर आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एक व्यक्तीची विचारपूस करतात. पुढे अनुपम खेर म्हणतात, “तुम्ही मला ओळखता का?” यावर ही व्यक्ती नाही असं उत्तर देते. त्यानंतर अनुपम खेर मास्क काढून पुन्हा त्यांना ओळखलं का? असा प्रश्न विचारतात. यावर “सर तुमचं नाव लक्षात नाही” असं उत्तर ज्ञानचंद यांनी दिल्यावर अनुपम खेर थक्क झाल्याचं पाहायला मिळतंय.

  हा व्हिडीओ शेअर करत अनुपन खेर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यात ते म्हणाले, ” रिअॅलिटी चेक. मी जगासमोर नेहमी मोठ्या गर्वाने मी ५१८ सिनेमांमध्ये काम केल्याचं सांगतो. मला वाटतं होतं प्रत्येकजण मला ओळखतो. मात्र ज्ञानचंदजींमुळे माझ्या आत्मविश्वासाला तडे गेले. त्यांना मी कोण आहे हे माहित नव्हतं. खरं तर हे मजेशीर आणि सुंदर होतं. मला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्यासाठी धन्यवाद मित्रा” असं सुंदर कॅप्शन अनुपम खेर यांनी दिलंय.