
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग बासू डोसा बनवताना दिसत आहेत.
- अनुराग बासूंनी बनवला अनुपम खेर यांच्यासाठी डोसा
- अनुराग बासू यांची लज्जतदार रेसिपी
- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Anupam Kher Video: बॉलीवूडच्या दमदार अभिनेत्यांचा उल्लेख केला तर त्यात अनुपम खेर (Anupam Kher) यांचे नाव नक्कीच येईल. अनुपम खेर यांची अभिनयशैली वाखणण्याजोगी आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणून अनुपम खेर यांचं नाव घेतलं जातं. आगामी काळात अनुपम खेर दिग्दर्शक अनुराग बासू (Anurag Basu) यांच्या ‘मेट्रो इन दिनो’ या (Metro In Dino) चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान, अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुराग बसू अभिनेता अनुपम खेरसाठी डोसा बनवताना दिसत आहेत.
अनुराग बासूंनी केला अनुपम खेर यांच्यासाठी डोसा
View this post on Instagram
शनिवारी अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेरसाठी अंडा डोसा बनवताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे की- ‘आजची ताजी बातमी, अनुराग बासूने मेट्रो इन दिनोच्या सेटवर माझ्यासाठी अंड्याचा डोसा बनवला आहे. पहा, शिका, खा आणि आनंद घ्या. अंड्याचा डोसा खाल्ल्यानंतर अनुपम यांनी अनुराग बासूंचे कौतुक केले.
“चित्रपटातील भूमिकाही चांगली होती आणि ताटातील डोसाही उत्कृष्ट होता. काहीही होऊ शकते. नमस्कार अनुराग बाबू.” अंडा डोसा खाल्ल्यानंतर अनुपम खेर यांनी अनुराग बासूंचे अशा प्रकारे कौतुक केले. अनुपम खेर आणि अनुराग बसू यांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, चाहते या व्हिडिओला प्रचंड लाइक्स आणि कमेंट करत आहेत.
‘मेट्रो इन दिनों’ ची उत्सुकता
दिग्दर्शक अनुराग बासूच्या ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्याशिवाय बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, अली फजल, नीना गुप्ता, कोंकणा सेन आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.