मुलासह भारतात परतली अनुष्का, पापाराझींना पाहायला मिळाली अकायची झलक; फोटो घेण्यास दिला नकार!

अनुष्काची दुसरी प्रसूती लंडनमध्ये झाली आणि तेव्हापासून ती तिथेच आहे. अनुष्का शर्मा आई झाल्यापासून तिच्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आसुसले आहेत

    बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) बराच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसत नाही आहे. दुस-या गरोदरपणापासून ती मीडिया आणि अभिनयापासून लांब आहे. तिच्या मुलाच्या जन्मानंतर, ती लंडनमध्ये राहिली. चाहते तिच्या भारतात परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

    अनुष्का शर्माने दाखवला तिच्या मुलाचा चेहरा?

    अनुष्काने 15 फेब्रुवारीला मुलगा अकायला जन्म दिला. तिची दुसरी प्रसूती लंडनमध्ये झाली आणि तेव्हापासून ती तिथेच आहे. अनुष्का शर्मा आई झाल्यापासून तिच्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आसुसले आहेत दरम्यान, अभिनेत्रीशी संबंधित एक आनंदाची बातमी चाहत्यांसाठी आली आहे.  मुलाच्या जन्मानंतर विराट कोहली आयपीएल सामन्यासाठी भारतात आला आहे. पण अनुष्का शर्मा लंडनमध्येच मुलांसोबत वेळ घालवत होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार अनुष्का भारतात आल्याची शक्यता आहे. यावेळी अनुष्काने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना नाही तर पापाराझींना दाखवला आहे. अनुष्काने पापाराझींना तिच्या मुलाची झलक दाखवली, परंतु त्याचा फोटो घेण्यास नकार दिला. योग्य वेळ आल्यावर ती स्वतः तिचा चेहरा उघड दाखवणार आहे.

    अनुष्का शर्मा वर्कफ्रंट

    अनुष्का शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीच्या निर्मितीमध्ये नेटफ्लिक्स रिलीज झालेला ‘बुलबुल’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा एक पीरियड हॉरर ड्रामा चित्रपट आहे. त्याची प्रमुख अभिनेत्री तृप्ती दिमरी होती. दरम्यान, आता अनुष्का आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक बायोपिक चित्रपट असून अनुष्का क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.