अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा मुलगा बनला सोशल मीडिया स्टार, नेटकऱ्यांमध्ये वेगळीच क्रेझ!

विराट आणि अनुष्काला 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्त झालं. पण बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनी त्यांनी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे.

  बॉलीवूड स्टार्सच्या मुलांची खूप चर्चा केली जाते, त्यामध्ये करीनाचा मुलगा तैमूर (Taimur)ते प्रियंकाची मुलगी मालतीमेरी (Malatimeri) यांचा समावेश आहे. नुकतंच अनुष्का शर्मा  (Anushka Sharma)आणि विराट कोहली  (Virat Kohli) त्यांच्या दुसऱ्या मुलाची बातमी (Anushka Sharma Baby Boy) चाहत्यांसोबत शेयर केली. अनुष्का आणि विराटवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. पण विराट अनुष्कानं विचार नसेल केला कधी की त्यांचा मुलगा जन्माला येताच सोशल मीडिया स्टार होईल. मुलाचा चेहराही अद्याप दिसला नाही मात्र, त्याच्या हटके नावाची चर्चा सुरू आतापासून सुरू झाली आहे.

  अकायच्या नावाने सोशल मिडीयावर अनेक अंकाऊट

  अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अनुष्कानं 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. मात्र, दोघांनी मंगळवारी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. विराट आणि अनुष्काने अनुष्काच्या मुलगा अकायच्या नावाची सध्या सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अकायच्या नावाने अनेक सोशल मीडिया अकाऊंट तयार झाले. काहींमध्ये विराट, अनुष्का आणि वामिकाचे फोटो आहेत. काहींमध्ये तो विराटचा लहानपणीचा फोटो आहे तर काहींमध्ये तो क्रिकेटरचा लेटेस्ट फोटो आहे. जर तुम्ही स्वतः शोधले तर तुम्हाला अकायच्या नावावर अनेक फॅन क्लब खाती दिसतील.

  अनुष्तकाची पोस्ट चर्चेत

  बाळाची घोषणा करताना अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ’15 फेब्रुवारीला आम्ही आमचा मुलगा अकाय आणि वामिकाच्या धाकट्या भावाचं स्वागत केलं आहे. हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या आनंदाच्या काळात आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. अशा वेळी कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी आमची इच्छा आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)