अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरात पुन्हा बाळाचं आगमन, वामिकाला मिळाला लहान भाऊ!

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा पालक बनले आहेत. 15 फेब्रुवारीला तिच्या मुलाचा जन्म झाल्याची पोस्ट अभिनेत्रीने केली होती. त्यांनी आपल्या मुलाचे नावही सांगितले.

  नुकतंच अभिनेता विक्रांत मेसीच्या घरी लहान बाळाचं आगमन झालं. तर अभिनेता वरुण धवनच्या घरीही लवकचरच पाळणा हलणार आहे. या सेलिब्रिटींनी ही गोड बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेयर केली. आता या यादीत आणखी एका सेलेब्रिटीचं नाव आलं आहे. अनुष्का शर्मा विराट कोहली पुन्हा पालक झाले आहे. अनुष्कानं 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म (Anushka Sharma Baby Boy) दिला. तिनं एक पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्यां मुलाचे नाव अके आहे. अनुष्कानं लिहिले की, वामिकाच्या धाकट्या भावाचं जगात स्वागत आहे. तिच्या पोस्टवर चाहतेसहीत सेलेब्रिटीही कंमेंट करत असून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

  अनुष्काची पोस्ट व्हायरल

  अनुष्कानं पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘आमच्या हृदयात खूप आनंद आणि खूप प्रेम आहे, आम्हाला तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही लहान मुलगा अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचं जगात स्वागत केलंय.’

  अनुष्का पुढे म्हणाली, ‘तुमच्या आशीर्वादाची वाट पाहत आहे. आम्ही विनंती करतो की तुम्ही यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता, विराट आणि अनुष्का.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  बेबी बंपसोबत स्पॉट झाली होती अनुष्का

  अनुष्का आणि विराट कोहलीने दुसरी प्रेग्नेंसी नेहमीच लपवून ठेवली. सप्टेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा ही अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली होती. यामुळेच ती सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही आणि विराटसोबत क्रिकेट टूरमध्येही सहभागी झाली नाही.

  2021 मध्ये मुलीला जन्म दिला

  अनुष्का आणि विराटने 2017 मध्ये इटलीमध्ये एका इंटिमेट सोहळ्यात लग्न केले होते. जानेवारी २०२१ मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लग्नानंतर अनुष्का चित्रपटांपासून दूर आहे. 2018 मध्ये झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.