anushka sharma wishes vicky and katrina

लग्नानंतर कतरिना आणि विकी टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे शेजारी होणार आहेत. विकी आणि कतरिनाने  लग्नानंतर राहण्यासाठी जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे.अनुष्का शर्माने(Anushka Sharma Wishes Vicky And Katrina On Their Wedding) कतरिनाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल(Vicky kaushal) हे दोघे लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील(Rajsthan) सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे त्यांनी लग्न केले. या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्का शर्माने(Anushka Sharma Wishes Vicky And Katrina On Their Wedding) दिलेल्या शुभेच्छा लोकांना खूप आवडल्या आहेत.

    anushka wishing vicky and katrina

    अनुष्काने कतरिनाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करत अनुष्का म्हणाली, “तुम्हाला दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा! आशा आहे की तुम्ही दोघे आयुष्य भर एकत्र रहा, तुमच्यात कायम प्रेम राहो. याचाही आनंद आहे की अखेर तुमचं लग्न झालं आणि तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश कराल आणि आता आम्हाला तुमच्या घरातला कन्स्ट्रक्शनचा आवाज ऐकायला मिळणार नाही.”

    लग्नानंतर कतरिना आणि विकी टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे शेजारी होणार आहेत. विकी आणि कतरिनाने  लग्नानंतर राहण्यासाठी जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. हे घर पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले असून त्यासाठी मोठी रक्कम दिल्याचे समजते. आठव्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट जुलै २०२१ मध्ये भाड्याने घेतले आहे.

    कतरिना आणि विकी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला.