विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची भावनिक पोस्ट, मला जगाला ओरडून सांगायचे आहे की, तू किती अद्भुत व्यक्ती आहेस

विराटच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने कोहलीसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पत्र लिहिले आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “हा फोटो आणि तुम्ही तुमचे आयुष्य ज्या पद्धतीने जगता त्याला कोणत्याही फिल्टरची किंवा निकषाची गरज नाही. तुमचे जीवन प्रामाणिकपणाने आणि धैर्याने बनलेले आहे. तुमच्यामध्ये असलेले धैर्य जीवनातील कोणत्याही शंकांना दूर करते.

    मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने कोहलीसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पत्र लिहिले आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “हा फोटो आणि तुम्ही तुमचे आयुष्य ज्या पद्धतीने जगता त्याला कोणत्याही फिल्टरची किंवा निकषाची गरज नाही. तुमचे जीवन प्रामाणिकपणाने आणि धैर्याने बनलेले आहे. तुमच्यामध्ये असलेले धैर्य जीवनातील कोणत्याही शंकांना दूर करते. मी अशा इतर कोणालाही ओळखत नाही की, तुझ्यासारख्या अंधाऱ्या ठिकाणाहून स्वत:ला वर काढणारा कोणी असेल हे मला माहीत नाही.’

     

    View this post on Instagram

     

    A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

    अनुष्काने पुढे असे लिहिले आहे की, ‘विराट तू प्रत्येक बाबतीत चांगला आहेस, कारण तू काहीही कायमस्वरूपी मानत नाहीस, तू खूप निडर आहेस. मला माहित आहे की, आपण सोशल मीडियाद्वारे असे एकमेकांशी बोलू नये, परंतु कधी-कधी मला फक्त ओरडून जगाला सांगायचे असते की, आपण किती आश्चर्यकारक आणि अद्भूत व्यक्ती आहात. क्यूटनेसला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

    विरानुष्काचे २०१७ मध्ये लग्न

    विराट कोहलीने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये दोघेही एका मुलीचे पालक झाले. भारतीय संघाचा कर्णधार सध्या यूएई मध्ये सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. विश्वचषकानंतर तो टी-२० मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार नाही. कामाच्या ताणामुळे त्याने आयपीएलमधील बंगळुरूचे कर्णधारपदही सोडले आहे. दरम्यान आज विराटचा वाढदिवस असल्याने विराटवर जगभरातून शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.