सूड घेण्यास आसुसलेली, अत्याचारित महिलेच्या भूमिकेसाठी तयारी करण्याकरिता अपेक्षाने स्वत:ला भूमिकेच्या बारीक-सारीक गोष्टींमध्ये सामावून घेतले. कोयलची पार्श्वभूमी जाणून घेण्यापासून तिच्या प्रवासामध्ये सामावून जाण्यापर्यंत, तसेच स्वत:हून उच्चस्तरीय ॲक्शन सीन्स करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या प्रबळपणे तयारी करण्यापर्यंत अपेक्षासाठी पडद्यावर ही भूमिका वास्तविक रूपात सादर करणे महत्त्वाचे होते.
मुंबई : सोनी लिव्हची लक्षवेधक क्राइम थ्रिलर ‘अनदेखी २’ (Undekhi 2) चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक ही सिरीज सुरू होण्याची उत्सुकतेने वाटत पाहत आहेत. दुसरा सीझन अधिक ड्रामा व ॲक्शनची खात्री देतो, ज्यामध्ये अटवालच्या दहशतीविरोधात बंड करण्यासाठी जुने व नवीन पात्र एकत्र येतात. सिरीजमध्ये कोयलची भूमिका साकारणारी अपेक्षा पोरवाल (Apeksha Porwal) संवेदनशील भूमिका साकारण्याच्या अनुभवाबाबत, तसेच त्यासाठी केलेल्या तयारीबाबत सांगत आहे. सोनी लिव्हवर ४ मार्च रोजी सुरू होत असलेली सिरीज ‘अनदेखी २’ पहिल्या सीझनमध्ये समाप्त झालेल्या ठिकाणापासून शक्ती, सूड व संरक्षणाच्या कथेला पुढे घेऊन जाते.
सूड घेण्यास आसुसलेली, अत्याचारित महिलेच्या भूमिकेसाठी तयारी करण्याकरिता अपेक्षाने स्वत:ला भूमिकेच्या बारीक-सारीक गोष्टींमध्ये सामावून घेतले. कोयलची पार्श्वभूमी जाणून घेण्यापासून तिच्या प्रवासामध्ये सामावून जाण्यापर्यंत, तसेच स्वत:हून उच्चस्तरीय ॲक्शन सीन्स करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या प्रबळपणे तयारी करण्यापर्यंत अपेक्षासाठी पडद्यावर ही भूमिका वास्तविक रूपात सादर करणे महत्त्वाचे होते.
ती म्हणाली, ”सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ॲक्शन वास्तविक वाटण्यासोबत त्यामधून कौशल्यापेक्षा मनात असलेली ज्वलंत भावना व्यक्त करण्याची खात्री घ्यायची होती. माझी भूमिका कोयलला ती मोठी झालेल्या वातावरणामुळे हातांनी किंवा लाकडी दांड्यासह कशाप्रकारे स्वत:चे संरक्षण करावे हे माहित आहे. तिने यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. म्हणून माझ्यासाठी या भूमिकेला पडद्यावर न्याय देणे अत्यंत महत्त्वाचे होते. मी देहबोली, बंगाली भाषेवर काम केले आणि मी कोणतेही मेक-अप केला नाही. मी स्वत:हून सर्व स्टण्ट्स केले, कोणतेही स्टण्ट डबल घेण्यात आले नाहीत. आमचे ॲक्शन डायरेक्टर राज शिंदे यांच्या मार्गदर्शनांतर्गत ॲक्शन टीमने प्रशिक्षणात प्रचंड मदत केली, ज्यामुळे सर्वकाही विनासायास पार पडले.”
बनिजय एशियासोबत सहयोगाने ॲप्लॉज एंटरटेन्मेंट निर्मित ‘अनदेखी सीझन २’मध्ये सुर्या शर्मा, दिब्येंदू भट्टाचार्य, हर्ष छाया, अपेक्षा पोरवाल, आंचल सिंग, नंदिश संधू व मेयँग चँग प्रमुख भूमिकेत आहेत. या सिरीजचे दिग्दर्शन आशिष आर. शुक्ला यांनी केले आहे.
‘अनदेखी २’चे सर्व १० एपिसोड्स पहा ४ मार्चपासून फक्त सोनी लिव्हवर