अथिया शेट्टीच्या घरी लवकरच हलणार पाळणा? वडील सुनील शेट्टींनी दिला इशारा!

क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टी नेहमीच त्यांचे आयुष्य खूप खाजगी ठेवतात, परंतु अशी चर्चा आहे की ही जोडी लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकते, ज्याचा अंदाज सुनील शेट्टीच्या विधानावरुन लावला जात आहे.

    अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) गेल्या वर्षी क्रिकेटर केएल राहुलशी (KL Rahul) लग्न केले. आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आता  बातमी अशी आहे की हे जोडपे आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झाले आहे. हे जोडपं आता  पालक बनणार असुन अथिया शेट्टीच्या प्रेग्नंट असल्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. तसे संकेत तिच्या वडिलांनी म्हणजे सुनील शेट्टीने (Suniel Shetty) एका कार्यक्रमात दिले आहेत.

    डान्स दिवाने कार्यक्रमातील सुनील शेट्टीचं वक्तव्य चर्चेत

    मीडिया रिपोर्ट्स नुसार अथिया शेट्टी प्रेग्नंट आहे, याचा अंदाज सुनील शेट्टीच्या वक्तव्यावरून वर्तवला जात आहे. वास्तविक, सुनील शेट्टी माधुरी दीक्षितसोबत ‘डान्स दिवाने’ या लोकप्रिय डान्स रिॲलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या शोमध्ये एका खास एपिसोडचे आयोजन करण्यात आले होते, तो ‘आजी आजी-आजोबा स्पेशल’ एपिसोड होता. या एपिसोडदरम्यान शोची होस्ट भारती सिंहने गंमतीने सुनील शेट्टीला विचारले की, तो आजोब झाल्यावर कसा वागेल.

    यावर प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टी जो बोलला त्यामुळे अथिया शेट्टीच्या प्रेग्नेंसीच्या अफवा आणखीनच वाढल्या. सुनील म्हणाला, ‘पुढचा सिझन आल्यावर मी नानासारखा स्टेजवर फिरेन’. आता सुनीलच्या वक्तव्यावरून असा अंदाज लावला जात आहे की त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि जावई केएल राहुल त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत. जरी हे जोडपे नेहमीच त्यांचे आयुष्य खूप खासगी ठेवत असले तरी, चाहत्यांना लवकरच काही चांगली बातमी मिळू शकेल अशी चर्चा सध्या सुरू आहे.