salman khan and katrina kaif

अरिजीतने पहिल्यांदाच सलमानसाठी गाणं गायलं आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं आहे.

    सलमान खानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान रॉ एजंट अविनाश राठोड उर्फ टायगरच्या रुपात दिसणार आहे. ‘टायगर 3’ गाण्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ‘लेके प्रभू का नाम’(Leke Prabhu Ka Naam) असं या गाण्याचं नाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सलमान आणि अरिजीत यांच्यामधलं शत्रूत्व तब्बल 10 वर्षांनी संपलं आहे. ‘लेके प्रभू का नाम’ हे अरिजीतने पहिल्यांदाच सलमानसाठी गायलेलं गाणं आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं आहे.

    सलमान आणि अरिजीतमध्ये का होता वाद?
    सुमारे 10 वर्षांपूर्वी एका अवॉर्ड शोदरम्यान अरिजित सिंग आणि सलमान खान यांच्यातील संबंध बिघडले होते. यावेळी अरिजित सिंगने पुरस्कार जिंकला होता. अरिजीत कॅज्युअल आउटफिट आणि चप्पल घालून पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेला. तेव्हा सलमान गंमत म्हणून म्हणाला, ‘तो झोपला होता…’. यावर अरिजीत म्हणाला होता, “तुम्ही माझी झोप उडवली. तेव्हा सलमान म्हणाला होता की,‘ तुमची चूक नाही तर.. तुम ही हो गाणं ऐकून लोक झोपी जातात..’ असा किस्सा यावेळी घडला होता. दरम्यान, या घटनेनंतर सलमान खानने त्याच्या बजरंगी भाईजान, किक आणि सुलतान या चित्रपटातून अरिजीतचे गाणे काढून टाकले होते. त्यानंतर अरिजीत सिंगने सलमान खानची माफीही मागितली. अरिजीतने त्या रात्री अवॉर्ड शोमध्ये सलमानचा अपमान केला नसल्याचे देखील सांगितले होते. मात्र, आता अनेक वर्षांनंतर दोघांमधील हे भांडण संपल्याचं दिसून येत आहे.

    टाइगर 3 यावर्षी 12 नोव्हेंबर, रविवारी रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

    ट्रेलरनंतर रिलीज झालेल्या ‘टायगर 3’ मधल्या पहिल्या गाण्याविषयी दिग्दर्शक मनीष शर्मा म्हणतात , “आम्ही पुढच्या आठवड्यात ‘लेके प्रभु का नाम’ रिलीज होण्याची आतुरतेने वाट बघतोय. कतरिनाचे अलौकिक सौंदर्य आणि दोघांमधील केमिस्ट्री या गाण्यात बघायला मिळेल. प्रत्येकाला नाचायला लावणारं हे गाणं आहे. आम्‍ही टर्कीच्‍या कॅप्‍पाडोशियामध्‍ये खूप मजा केली आणि सलमान आणि कतरिनावर चित्रीत झालेलं हे गाणं आणि डान्‍स चार्टबस्‍टर ठरेल.”