सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीला मलायका अरोरा अर्जुन कपुरचीच चर्चा! जबरदस्त लुकमध्ये दिसले दोघंही

या व्हिडिओमध्ये हे कपल खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. एकीकडे मलायका हिरव्या रंगाच्या आउट फीटमध्ये खूप सुंदर दिसत आहे, तर दुसरीकडे अर्जुन काळ्या कुर्ता पायजमामध्ये रॅायल लुकमध्ये कहर करताना दिसतोय

  देशभरात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.  सोमवारी दिवाळीच्या दिवशी, बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये तिचा भाऊ अर्जुन कपूर त्याच्या लेडी लव्ह म्हणजेच मलायका अरोरासोबत पोहोचला होता. यादरम्यान दोघांनी हातात हात घालून धमाकेदार एन्ट्री घेतली, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

  या व्हिडिओमध्ये हे कपल खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. एकीकडे मलायका हिरव्या रंगाच्या आउट फीटमध्ये खूप सुंदर दिसत आहे, तर दुसरीकडे अर्जुन काळ्या कुर्ता पायजमामध्ये या रॅायल लुकमध्ये कहर करताना दिसतोय. दरम्यान, दोघांनीही पापाराझींना एकत्र पोज दिली. हा व्हिडिओ समोर येताच, सोशल मीडियावर चाहते या बी-टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्याचे कौतुक करत आहेत. व्हिडिओ पहा…

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)